Sunday, April 10, 2011

The Sachin Tendulakars New House(Shell house at Bandra)Mumbai


The Sachin Tendulakars New House(Shell house at Bandra)Mumbai


Architect: Javier Senosiain


Location: Bandra- Mumbai-India


Nautilus


Light, colour and shape


Interior garden


Fluidity of space


Shell


Path

 
The TV Room


Add caption


Saturday, April 2, 2011

महत्व गुढी पाडव्याचे

महत्त्व : 
इसवी सन जानेवारीपासून, आर्थिक वर्ष एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्गाता
`
वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही.
`
द्वादशमासै: संवत्सर: ' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने
मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आध्यात्मिक कारणे आहेत.


ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो
बिंदू होय.) वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी
येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक : या दिवशी 
. रामाने वालीचा वध केला. राक्षसांचा रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

आध्यात्मिक सृष्टीची निर्मिती : 

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : 

`गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता
सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

नवीन हिंदू वर्षाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक प्रेमपूर्वक शुभेच्छा !!!!


नैसर्गिक :